*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गणपती बाप्पा*
तुज पाहता रे बाप्पा
किती येते चैतन्यस्फूर्ती
भारी डामडौल आरास
देखणी गोजिरवाणी मूर्ती
सुंदर मखरी बैसला
बाळगोपाळ पुढ्यात नाचला
लोभसवाणा किती देखणा
आवडी दुर्वांची तुजला
तू आनंदाचा हर्षवारा
घराघरात तुझा निवास
लाडू मोदकांची मेजवानी
आवर्जून तुजसाठी खास
विघ्नहर्ता तू एकदंता
सकाळ संध्याकाळ आरती
अथर्वशीर्ष अन् होमहवन
दहा दिवसांचा गणपती
तुजभोवती मन रुंजी घेई
काम धंदा सुचत नाही
मंगलमूर्ती मोर्या म्हणत
पुढल्या वर्षाची वाट पाही….
*पुष्पा सदाकाळ*
*भोसरी पुणे*.
