You are currently viewing फोंडाघाटात मोरी खचली; मोठ्या वाहनांची वाहतूक बंद, लहान वाहनांसाठी मार्ग खुला

फोंडाघाटात मोरी खचली; मोठ्या वाहनांची वाहतूक बंद, लहान वाहनांसाठी मार्ग खुला

फोंडाघाटात मोरी खचली; मोठ्या वाहनांची वाहतूक बंद, लहान वाहनांसाठी मार्ग खुला

फोंडाघाट

अत्यंत पावसामुळे फोंडाघाट चेकपोस्टजवळील मोरी खचल्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. समाजसेवक अजित नाडकर्णी यांनी तात्काळ कणकवली पोलीस स्थानकात संपर्क साधून मोठी वाहने पर्यायी मार्गाने वळवण्याची विनंती केली, अन्यथा लहान वाहनांनाही अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

पोलिसांनी त्वरित बॅरीकेट्स लावून वाहतूक नियंत्रित केली. सद्यस्थितीत लहान वाहनांसाठी मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

कॉन्ट्रॅक्टरने संध्याकाळपर्यंत मोरीचे काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याची ग्वाही दिली आहे. पोलीस यंत्रणेसह पोलीस आऊटपोस्टनेही मोलाचे सहकार्य केले.

– अजित नाडकर्णी, संवाद मीडिया

प्रतिक्रिया व्यक्त करा