कुडाळ शहर शिवसेनेची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर — चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर उपशहरप्रमुख
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत नियुक्त्या; युवा व महिला सेनेचाही समावेश
कुडाळ
कुडाळ शहरातील शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रम कुडाळ एमआयडीसी येथे पार पडला. यावेळी उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहरप्रमुख अभी गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, रेवती राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीत विविध पदांवर युवा सेना, महिला सेना व शाखाप्रमुख यांचीही नियुक्ती करण्यात आली. शहर संघटक म्हणून सुरेश राऊळ, शहर समन्वयक राकेश नेमळेकर, युवा सेना संघटक चंदन कांबळी, तसेच विविध वाड्यांतील प्रतिनिधींना शाखाप्रमुख पदांवर नेमण्यात आले आहे.
महिला सेनेच्या संघटकपदी नयना मांजरेकर, सचिव सलोनी पाटकर, कार्यकारिणी सदस्य रिया गडेकर, कविता राणे, संजना गडेकर, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
शहरातील विविध वाड्यांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा समावेश करत ‘जम्बो’ कार्यकारिणी स्थापन केल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
