सिंधुदुर्गनगरी :
वन्य प्राण्यांपासून शेतीचे आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनतर्फे शेतकऱ्यांना शेती संरक्षण शस्त्र परवाने दिले जातात. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना तसेच मृत परवानाधारकांच्या वारसांना प्रतिनिधिक स्वरूपात परवान्यांचे वितरण केले जाणार आहे.
हे वितरण पोलिस परेड ग्राउंड, सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या वेळी होईल. यामुळे शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून स्वतःचे आणि त्यांच्या पिकांचे संरक्षण करणे शक्य होईल.
