You are currently viewing निर्भय लेखन

निर्भय लेखन

*ज्येष्ठ साहित्यिक संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निर्भय लेखन*

 

लेखणीचे स्वातंत्र्य टिकविले

कवी लेखक साहित्यिकांनी निर्भीड होऊन

पत्रकार, संपादक यांनीही

झुकले नाहीत कधी दबावापुढे

केला विरोध त्यांनी हुकुमशाही निर्बंधांचा

विचार स्वातंत्र्य मानले श्रेष्ठ सदा

पुरस्कार वापसी केली अनेक मान्यवरांनी

प्रलोभने राजकीय व्यवस्थेने देऊनही

नाकारले बाणेदारपणे सत्कार, सन्मान, पदे

संघर्ष करावा लागला तरी सरकार यंत्रणेशी

स्वाभिमानी, मनस्वी होऊन.

प्रतिकार केला दमन शक्तीचा

आपल्या अधीन करण्यासाठी वापरले

राजकीय सत्तेचे दुरूपयोग

ठरविले गेले त्या लेखणीला देशद्रोही

चालविले गेले खोटे खटले

चौथ्या स्तंभाला केले गेले डळमळीत

विकले गेले काही देशात

ट्रोल चालवून बदनामी करणे उद्देश ठेवून.

बुरखे त्यांचे फाडण्यासाठी

सत्यनिष्ठ, तत्वनिष्ठ राहू या

लेखणीचे स्वातंत्र्य जपू या

 

-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

पुनावळे पुणे ३३

प्रतिक्रिया व्यक्त करा