You are currently viewing सावंतवाडी येथे भव्य दिव्य तसेच असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा संपन्न…

सावंतवाडी येथे भव्य दिव्य तसेच असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा संपन्न…

सावंतवाडी येथे भव्य दिव्य तसेच असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा संपन्न…

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जिल्हा संयोजक संदिप गावडे यांचे आयोजन

जिल्हा संयोजक संदिप गावडे यांनी हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेमध्ये आज सावंतवाडी करांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. सर्व समावेशक तसेच राष्ट्र प्रेमाचे प्रतीक म्हणून या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. या यात्रेमध्ये सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थी , एनसीसी कॅडेट्स, महिला, डॉक्टर, पत्रकार,व्यापारी, तसेच तालुक्यातिल असंख्य नागरिक यांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली. सावंतवाडीकरांच्या मनात असलेल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती यावेळी दिसून आली. जिल्ह्यातील आकर्षक व भव्य अशी तिरंगा यात्रा निघाली अशी उपस्थितांची प्रतिक्रिया यावेळी होती. या तिरंगा यात्रेला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाबँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, हर घर तिरंगा जिल्हा संयोजक संदिप गावडे, मनोज नाईक, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा