You are currently viewing 12 ते 17 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

12 ते 17 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी  रविवार दि. 12 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन State Level “MEGA JOB FALR” चे आयोजन करण्यात आलेले आहे.

            जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर पंडित दीनद्याळ उपाध्याय स्टेट लेवल “MEGA JOB FALR”  मध्ये आपली रिक्तपदे अधिसुचित करावीत. जिल्‍हयातील नोकरी साधक (job seeker)उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाई करावे, अधिक माहितीसाठी 02362 228835 मो.9403350689 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन शालिक पवार सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =