You are currently viewing शिवशंकर–महादेव

शिवशंकर–महादेव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम अभंग*

 

*शिवशंकर–महादेव*

 

 

खुलभर दूध| देवांच्याही देवा|

तुम्हा महादेवा।वाहियले॥१॥

 

जप साधा सोपा | ऊॅं नमः शिवाय।

तूच मृत्युंजय। भोलेनाथा॥२॥

 

प्रसन्न होतसे ।शिवामूठ व्रत ।

करा श्रावणात ।सदाशिव ॥३॥

 

शंकराला प्रिय | बेलाचे त्रिदल|

दिनांचा दयाळ| गंगाधर॥४॥

 

समुद्रमंथन। विष प्राशियले।

नाव प्राप्त झाले। नीलकंठ ॥५॥

 

गळ्यामध्ये नाग|भस्म अंगावर |

हाच अलंकार।श्रीसांबाचा॥६॥

 

वाराणसी प्रिय| शंकराचे स्थान|

तुजला नमन।आशुतोषा॥७॥

 

विद्या रानडे

प्रतिक्रिया व्यक्त करा