You are currently viewing तोंडवळी तळाशील येथील गाज रिसॉर्टच्या काचा अज्ञाताने फोडल्या

तोंडवळी तळाशील येथील गाज रिसॉर्टच्या काचा अज्ञाताने फोडल्या

पोलिसांनी कसून तपासणी करावी संजय केळूसकर यांची मागणी

मालवण :

तोंडवळी तळाशील येथील माजी सरपंच संजय केळूसकर यांच्या मालकीच्या गाज रिसॉर्ट समोरील दर्शनी भागाच्या काचा रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्याची घटना घडली आहे. यात केळूसकर यांचे सुमारे ३० हजाराचे नुकसान झाले आहे. या बाबतची तक्रार त्यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे.या बाबतची माहिती देताना संजय केळूसकर म्हणाले की आपण व पत्नी कामानिमित्त मुंबई येथे गेलो होतो. आपला मुलगा घरी एकटाच होता. रिसॉर्ट लगत असलेल्या घरात तो एकटाच होता. रविवारी मध्यरात्री अज्ञाताने येऊन रिसॉर्टच्या दर्शनी भागाच्या काचा फोडल्या. हा प्रकार सोमवारी सकाळी निदर्शनास आला. केळूसकर म्हणाले रिसॉर्ट मध्ये असणाऱ्या वस्तू जागेवरच आहेत, यामागे चोरीचा उद्देश दिसत नाही. मात्र मला दहशत निर्माण करण्यासाठी, नाहक त्रास देण्यासाठी हा सारा प्रकार अज्ञाताने केलेला आहे. याबाबत माझ्या मुलाने मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मालवण पोलिसांनी कसून तपासणी करावी अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा