*वैभववाडी महाविद्यालय परिसरात रोटरीचे वृक्षारोपण*
वैभववाडी
रोटरी क्लब वैभववाडी आणि आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात कोकण विभागाच्या उपआयुक्त श्रीमती मनीषा देवगुणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष श्री.सचिन रावराणे, रोटरी सचिव व प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी, रोटे. माजी अध्यक्ष
प्रशांत गुळेकर, रोटे. विद्याधर सावंत, रोटे.संतोष टक्के, उपप्राचार्य डाॅ. कुंभार व सहकारी उपस्थित होते. उपआयुक्त श्रीमती मनीषा देवगुणे यांचे प्रभारी प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
