You are currently viewing फोंडाघाट महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती शिबिर संपन्न*  *फोंडाघाट ः प्रतिनिधी*

फोंडाघाट महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती शिबिर संपन्न* *फोंडाघाट ः प्रतिनिधी*

*फोंडाघाट महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती शिबिर संपन्न*

*फोंडाघाट

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन, मेरी माटी मेरा देश आणि मतदार नोंदणी व जन जागृती शिबिर संपन्न झाले. सदरचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या एन्. एस एस विभागामार्फत घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून त्या दिनाचे महत्त्व डॉ. बालाजी सुरवसे यांनी सांगितले. तसेच मेरी माटी मेरा देश ही संकल्पना विद्यार्थ्यांना सांगितली. या संकल्पनेद्वारे आपण 2040 सालापर्यंत जगात अग्रेसर असू. तो होण्यासाठी जी आत्मनिर्भरता आवश्यक आहे ती प्रेरणा म्हणजे ही संकल्पना आहे.

या कार्यक्रमाच्या नियमित्ताने नायब तहसीलदार निवडणूक विभाग सौ प्रिया परब बोलत होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात मतदार होण्याचे महत्त्व सांगितले. आपल्या देशाची लोकशाही बळकट करायचे असल्यास मतदार सुज्ञ असला पाहिजे. मतदार नोंदणी हे राष्ट्रीय काम आहे. राष्ट्राच्या उभारणीत याच मतदारांचे योगदान मोठे असणार आहे. देश घडवण्यासाठी जबाबदार मतदार होणे म्हणजे देशाचा विकास करणे होय. असे प्रतिपादन केले.

त्यानंतर त्यांनी ऑनलाईन व ऑफलाइन मतदार नोंदणी कशी करायची याची कार्यशाळा घेतली. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या संपर्कातील किमान पाच व्यक्ती नवीन मतदान करण्याचे आवाहन केले.

जिल्हा परिषद सदस्यश्री. संजय आग्रे म्हणाले की मतदार होणे आवश्यक आहे. आपल्या पसंतीचा, खऱ्या अर्थाने लोकसेवा करणारा, समाजात तळागाळात पोहोचणारा उमेदवार निवडून द्यायचाअसेल तर आपण मतदार असले पाहिजे. असे योग्य उमेदवार निवडून दिले तरच आपली व आपल्या समाजाची प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी सुज्ञ मतदार होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला फोंडाघाटच्या सरपंच सौ.संजना आग्रे यांनी आवर्जून उपस्थित दर्शवली व विद्यार्थ्यांची थेट संपर्क साधला.

माजी कृषी सभापती संदेश पटेल म्हणाले की आजच्या जगात विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे आवश्यक आहे मतदार होणे किंवा इतरांना मतदार करणे यासाठी ही जागृत राहणे आवश्यक आहे. मतदार जागृती हे परम कर्तव्य म्हणून काम करा.
असे प्रतिपादन केले.

डॉ. सतीश कामत म्हणाले की हे शिबिर नागरिक होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मतदार हा या देशाचा कणा आहे. लोकशाहीचा आधार आहे. विद्यार्थी मतदार म्हणून जागरूक झाले तर देश बलवान होईल. लोकशाही बलवान होईल या शिबिराबरोबरच मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले व मान्यवरांच्या समवेत शपथ घेण्यात आली. त्यातून देशाच्या विकासाची प्रेरणा विद्यार्थ्यांना देण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून या दिनाचे महत्त्व सांगून हुतात्म्यांचे योगदान विशद केले. त्यांच्या स्मृतीसाठी दोन मिनिट शांतता पाळून शांत शब्दांजली वाहन आली. या कार्यक्रमाला फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.सुभाष सावंत,संचालक राजू पटेल, फोंडाघाटचे तलाठी जयांवार, कर्मचारी पारकर परिसरातील बी.एल.ओ. श्री. दिलीप शेळके, श्री अजित कदम, सौ.नारकर, श्री. मनोज गव्हाणकर श्री.कौस्तुभ रेडकर,श्री. प्रशांत पाटील उपस्थित होते.

त्यानंतर कणकवली तहसीलदार श्री. दीक्षांत देशपांडे, मंडल अधिकारी श्री दिलीप पाटील व सौ प्रभु देसाई यांनीही उपस्थिती दर्शवली व सर्वच अभियाना विषयी चर्चा करून महाविद्यालयाच्या सहकार्याचे आभार मानले. या शिबिरास महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्गाचे सहकार्य लाभले.

 

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा