वेंगुर्ले : शहरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिक आणि ज्येष्ठ व्यापारी पॉप्युलर स्टोअर चे मालक मनमोहन विनायक दाभोलकर वय वर्ष ९४ यांचे बाजारपेठ येथील राहत्या घरी आज शुक्रवारी १८ जुलै रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मन्या बापू या नावाने ते प्रसिद्ध होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, विवाहित मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे. कपड्याचे व्यापारी अमर दाभोलकर यांचे ते वडील होत.
