You are currently viewing हल्ला केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग चे अथक प्रयत्न सुरु.

हल्ला केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग चे अथक प्रयत्न सुरु.

हल्ला केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग चे अथक प्रयत्न सुरु.*

सावंतवाडी

मळेवाड कोंडूरे देऊळवाडी येथे काल दुपारी बिबट्याने ४ शेतकऱ्यांवर प्राण घातक हल्ला केला होता, त्यानंतर तो बिबट्या काही वेळाने गायब झाल्याने वनविभागाला शोध घेणं कठीण बनलं, त्यामुळे काल सायंकाळी शोध मोहीम वनविभागाने थांबवली.

आज सकाळ पासून पुन्हा एकदा वनविभाग, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थ यांनी शोध मोहीम राबविली असून तो बिबट्या नदीच्या बाजूला पाण्याच्या पंपच्या केबिन असल्याचे निदर्शनासं आले त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे

दोडामार्ग येथून वनविभागने एक पिंजरा आणून लावला आहे मात्र बिबट्या बाहेर येत नसल्याने आता अजून एक पिंजरा दोडामार्ग वरून मागवला आहे.

वनविभागाचे त्यां बिबट्याला जेरबंद करण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा