You are currently viewing आषाढ

आषाढ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आषाढ*

 

आषाढात प्रथम

नभी मेघ दाटले

कालिदासाचे झाले

दूत!!

 

ग्रीष्माची काहिली

भुईला भेगा पडती

आवेगाने येत

जलधारा!!

 

काळे सावळे

नभी जलभरले मेघ

सौदामिनीची रेघ

चमकते!!

 

आसावली प्रिया

ये रे जलदा

सरेल आपदा

सृष्टीची!!

 

चिंब भिजवाया

मेघ गरजत आले

कल्पनेला फुटले

धुमारे

 

 

हिरव्या रानाचे

स्वप्न होई पूर्ण

मेघमाला संपूर्ण

बरसता!!

 

 

अरुणा दुद्दलवार@✒️

प्रतिक्रिया व्यक्त करा