*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जखमा उरात माझ्या*
ते शब्द बोचणारे जखमा उरात माझ्या
आभाळ दाटलेले हे काळजात माझ्या
चंद्रास लागलेला तो डाग पाहुनी मी
दाटे मनात शंका का अंतरात माझ्या
वठतात वृक्ष सारे जेव्हा ऋतू बदलतो
हा खेळ प्राक्तनाचा येते मनात माझ्या
आशा जरा न उरली नाही उमेद आता
सुकली फुले कशाला या अंगणात माझ्या
देवा तुला स्मरावे हा एक मार्ग आता
ही आर्तता मनीची आहे सुरात माझ्या
अरूणा मुल्हेरकर
