You are currently viewing निसर्ग निखळ सुंदर

निसर्ग निखळ सुंदर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

 

*”निसर्ग निखळ सुंदर”*

पहाटे उठता म्हणावे सर्वां सुप्रभात

चैतन्य मिळेल आपोआप निसर्गदत्त!!धृ!!

 

निसर्ग सदा माणसाशी बोलतो निखळ

मनाचा आरसा प्रतिबिंब दिसे निर्मळ

हिरवाई ठेवते तजेलदार सुमन!!1!!

 

निळे विस्तीर्ण आकाश असते भवताल

पाखरे विहरतात स्वच्छंदे अंतराळ

खगांची चिव चिव बनते जीवन संगीत!!2!!

 

विना साधना कोण शिकवते हे संगीत

तुकोबा म्हणती उद्याने कोकीळ गाते गीत

जीवन बहरे खुलवे फुलवे सप्त नाद!!3!!

 

फुलांचा गंध आयुष्याचा असे मधुमास

रंगसंगती लाभते निसर्गदत्त लोभस

उमलती विभिन्न वेळी आकार सुगंध!!4!!

 

सूर्य चंद्र उदय अस्त देती नित्यानंद

ना कंटाळा ना कधी कोणाची पहात वाट

सदा असे त्याग ना निंदा ना कशाची खंत!!5!!

 

ना धरी खोटा मुखवटा स्वरूप सत्य

ना कसली हूर हूर कृतज्ञता ना बोज

स्थित्यंतरे घडती तरी सर्व स्थितप्रज्ञ!!6!!

 

निसर्ग पहावा वाचावे ऐकावे संगीत

जे ठेवी मनांस ताजेतवाने अनुलीप्त

सर्व कर्म देते नित्य नवा शोध आनंद!!7!!

 

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा