You are currently viewing नेमाचा होतो “गेम”

नेमाचा होतो “गेम”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नेमाचा होतो “गेम”*

 

फक्त तुझ्या *रंगाने*

रसनेला पाझर फुटतो

आवर घालून मनाला

फक्त आवंढा गिळतो

 

पाहून रंग तो न्यारा

बेभान होते *जिव्हा*

ईच्छेवर ठेवत ताबा

वाटतो घास घ्यावा

 

बाजूची हिरवी मीरची

तिखटाचा देई इशारा

नाकाला येता *वास*

डोळ्यातून गळती धारा

 

पाहून मोहकसे रूप

मोडून पडतो *नेम*

मुखात जाता घास

नेमाचा होतो *गेम*

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा