सातार्डा सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाच्या शाखेत लागली आग
जीवित हानी नाही मात्र,कागदपत्रे जळाली ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे अनर्थ टळला.
सावंतवाडी.
सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाच्या शाखेत गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीमध्ये जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटने आग लागण्याची माहिती मिळाली. आग लागल्याची माहिती ग्रामस्थांना मिळतात आग विझविण्यासाठी देऊळवाडी, घोगळवाडीतील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली त्यामुळे अनर्थ टळला आहे.
गुरुवारी रात्री सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे सातार्डा ग्रामस्थांना दिसले.आग लागल्याचे समजताच देऊळवाडी परिसरातील तरुणांनी बँकेकडे धाव घेत दुसऱ्या मजल्यावर जात लाकडी दरवाजा तोडून तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. बँकेला लागलेली आग एवढी मोठी होती की आगीचा वणवा आटोक्यात आणण्यासाठी बँके लगत असलेल्या दादा घाडी यांचा घरचा मोटरपंप वापरून आगीवर पाणी मारण्यात आले. तरुणांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर तासाभराने आगीवर नियंत्रण आणण्या यश आले. तरुणांच्या प्रसंगवधनाने मोठा अनर्थ टळला. अन्यथा सेंट्रल बँकेच्या तळमजल्यावर असलेले फर्निचरचे ऑफिस व बाजूला ए टी एम मशीन जळून मोठा अनर्थ घडला असता. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली.
बँकेला आग लागल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते आपा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, चंद्रशेखर प्रभू, अक्षय पेडणेकर जयेश तुळसकर, नितीन मांजरेकर, यतीन घाडी, सोनेश सातार्डेकर, संदेश सातार्डेकर, आत्माराम घाडी, प्रथमेश पेडणेकर यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले .
