कणकवलीत काँग्रेसतर्फे राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन…
कणकवली
येथील तालुका काँग्रेस कार्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना आज अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा पदाधिकारी अनिल डेगवेकर, प्रवीण वरुणकर, व्ही. के. सावंत, बाळू मेस्त्री, प्रदीपकुमार जाधव, आयशा सय्यद, निलेश मालंडकर, बाबा काझी, राजू वर्णे आदीउपस्थित होते.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने आज आपण येथे एकत्र आलो आहोत. राजीव गांधी हे नाव घेतलं, की एक तरुण, दूरदृष्टी असलेला, आधुनिक विचारांचा नेता आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. राजीव गांधी यांनी आपल्या देशाच्या राजकारणात एक नवा विचार आणि नवसंजीवनी दिली. देशात संगणकीकरण, दूरसंचार, आणि माहिती तंत्रज्ञानाचा पाया घालणारे ते पहिले पंतप्रधान होते. आज आपण मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल भारताबाबत बोलतो, त्याची मुहूर्तमेढ राजीव गांधींनीच रोवली होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रातही अनेक सुधारणा केल्या. नव्या पिढीला सक्षम करण्यासाठी त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण यावर भर दिला. पंचायतराज सशक्त करण्यासाठी त्यांनी ग्रामपातळीवर अधिकार देणारी व्यवस्था आणली ज्यामुळे सामान्य माणसाला थेट निर्णय प्रक्रियेत भाग घेता आला. राजीव गांधी हे केवळ राजकारणी नव्हते, तर एक संवेदनशील, तळमळीचे आणि देशप्रेमी नेतृत्व होते. देशासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आणि शेवटी देशासाठीच त्याग केला.
आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांचा आदर करत, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा संकल्प करूया एक आधुनिक, आत्मनिर्भर, आणि तंत्रज्ञानसंपन्न भारत करूया असे विचार उपस्थितांनी येथे व्यक्त केले.
