बुलढाणा / (बबनराव वि आराख) : दि १६ मे रोजी स्थानिक विश्राम भवन बुलढाणा येथे ममता विदर्भ एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने पालकमंत्री मकरंद पाटील यांना निवेदन देण्यात आले . त्याप्रसंगी समाजसेवक विजयजी पळसकर स्व निंबाजी पाटील बहुउद्देश्य संस्था डोणगाव ता मेहकर जि बुलढाणा व संजीवनी बहु. शिक्षण प्रसारण संस्था केळवद ता चिखली जि बुलढाणा, कल्पना बहुउद्देश्य संस्था खळेगाव व सरस्वती प्रकाश बहुउद्देशीय संस्था सावरगाव इत्यादी. स्थानिक जिल्ह्यातील संस्थांना मान्यता न देता बाहेर जिल्ह्यातील संस्थांना मंत्री आदिती ताई तटकरे यांनी मान्यता दिलेली आहे. बाल संगोपन योजना राबविण्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील संस्थांना प्रधान्य द्यायला पाहिजे होते परंतु ‘दाल में कुछ काला है..!’ स्थानिक जिल्ह्यातील संस्थांना प्राधान्य देण्यात यावे म्हणून ममता विदर्भ एनजीओ फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निवृत्ती भाऊ जाधव मेहकर तालुका अध्यक्ष विजय पळसकर व मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजकुमार मुंडे व लोणार तालुका अध्यक्ष नागरे सर इत्यादी एनजीओ फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये नमूद केले की सदर एनजीओला दिनांक ३०/०५/२०२५पर्यंत मान्यता न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी निवेदनामध्ये म्हटलेले आहे बाल संगोपन योजना राबविण्यासाठी शासनाने प्रस्ताव मागितलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक सेवाभावी संस्थांनी मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते गरीब गरजू अपंग अज्ञानी ० ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सदरची योजना राबविल्या जाते एकल पालक आई नाही किंवा वडील नाही कायद्याची मुले शेतकरी आत्महत्याग्रस्त स्थानची मुले आदिवासी अपंग ची मुले इत्यादी पालक नसलेल्या मुलांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई बाल संगोपन योजना राबविला जाते बाहेर जिल्ह्यातील संस्थांना मान्यता दिल्यामुळे सदर योजने मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकल महिला संघटनांनी अनेक वेळा केलेला आहे महिलांना त्रास दिला जातो स्थानिक संस्थांचे जिल्ह्यामध्ये कार्यालय नाही त्यांचे प्रतिनिधी नाही म्हणून पालकमंत्र्यांना सदरचे निवेदन देण्यात आलेले आहे. पालकमंत्री याकडे काय लक्षवेदतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाल संगोपन योजना राबविण्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील संस्थांना तात्काळ मान्यता द्या – समाजसेवक विजय पळसकर
- Post published:मे 18, 2025
- Post category:अमरावती / नाशिक / बातम्या / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
