You are currently viewing पुन्हा एकदा

पुन्हा एकदा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुन्हा एकदा*

(लवंगलता)

 

कुठे हरवला तेव्हाचा तो रंग प्रितीचा सारा

 

आयुष्याला सोसत नाही रुक्ष कोरडा वारा

 

संवाद नसे शब्द माधुर्य हरवले कसे कोठे

 

तेव्हा वाटे मौनात बरे.. नसते वादळ मोठे

 

ढग काळे ते दाटले नभी मिटोनि गेले तारे

 

जलधारांनो गाणे अपुले आनंदाने गारे

 

असा कसा तो गंध गोडवा विरोनि गेला आता

 

परत एकदा जुळवू आपण बेसुरातला भाता

 

वाटा ओल्या होत्या तेव्हा नरम किनारी वाळू

 

त्या वाळुतले सदन आपुले वचनांना मग पाळू

 

मावळतीला भास्कर जातो अज्ञानाच्या देशी

 

निरोप त्याला दोघे देऊ प्रेमस्मृतींच्या वेशी

 

नको दुरावा या वळणाशी त्या नात्यांच्या गाठी

 

जपूया तशा जशाच होत्या बेधुंद मनासाठी

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा