You are currently viewing नारी

नारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*नारी*

आजच्या महिला दिनी
नारी जाते हरखून
रोजच्या रहाटगाडग्यातून
दखल घेतली म्हणून…… १

रोज भांडी तीच
तरी रोजचा पदार्थ नवा
लक्षात ठेवत असते
कोणाला कोणता हवा……२

रोज त्याच हाताने करते
तरी रोजचा स्वाद निराळा
प्रेमाची फोडणी देऊन
जपते मायेचा भाव आगळा. .. ३

नाही सवय ऐकण्याची
कौतुकाचे दोन शब्द
यंत्रासारखी फिरत राहते
बाकी सगळे स्तब्ध… … … . ४

आज मात्र वर्तमानपत्रात
गुणगान तिचे लिखित स्वरूपात
दूरदर्शन समाज माध्यमात
तिचीच चर्चा तिलाच मान… … ५

बाहेरच्या जगापेक्षा
घरीच मिळावा थोडा सन्मान
घरच्यांच्या ओठी यावे
कौतुकाचे शब्द अमृतासमान. … . ६

सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे. 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा