भांडुप :
श्री विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट, भांडुप आणि सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच (दि. १७ जून, २०२३ रोजी) दत्त मंदिर, भांडुप येथे शैक्षणिक साहित्य व शालेय फीचे वाटप संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
या संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय फीचे वाटप केले जाते. यावर्षी १०० विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, गणवेश, सँडल, छत्री व शालेय फी यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुरेश कोपरकर व साहित्यिक प्रा. जयवंत पाटील तसेच संस्थेचे निलेश वैती, भावेश कोपरकर, निलेश पाटील, रमेश शेलार महेश पाटील, उषा काकडे, प्रवीण पवार, सुदाम सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.