You are currently viewing बाप

बाप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप*

काळ्या मातीच्या वावरी
बाप पांभर धरतो
एकेक दाणा मागे
माझा विठ्ठल पेरतो

कासरा हाती धरुन
सर्जा राजाला हाकतो
त्यांच्या प्रत्येक डोळ्यात
माझा विठ्ठल दिसतो

विळा खुरप्याच्या संग
बाप गवत कापतो
मागे विठ्ठल उभा राही
संगे ओवीला म्हणतो

नामघोषात विठुच्या
बाप उभा, बारे देतो
पाटाच्या पाण्याच्या संगे
सावळा विठु नाचतो

ताट जोमानं वाढली
कणसं शालू जोंधळ्याची
पानापानात दिसते
मुर्ती सावळ्या विठुची

दाणे पोत्यात भरतो
धान्याची रास पाहतो
गाडीवान विठुराजा
पोती घराला वाहतो

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा