You are currently viewing मुलाच्या खून प्रकरणी बापासह तिघांना अटक : 5 दिवस पोलीस कोठडी

मुलाच्या खून प्रकरणी बापासह तिघांना अटक : 5 दिवस पोलीस कोठडी

मुलाच्या खून प्रकरणी बापासह तिघांना अटक : 5 दिवस पोलीस कोठडी

इचलकरंजी : प्रतिनिधी

तारदाळ येथे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मदतीने बापानेच आपला मुलगा राहुल कोळी याचा सुपारी देऊन खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी राहुलचे वडील दिलीप तुकाराम कोळी (वय 55), पोलीस रेकॉर्डवरील विकास अनिल पोवार (वय 34, दोघे रा. तारदाळ) आणि सतीश शामराव कांबळे (वय 34, रा. तमदलगे) या तिघांना अटक केली. या तिघांना आज न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत शहापूर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की ,
तारदाळ (ता. हातकणंगले) येथे राहणारा सचिन कोळी याचा फिरून चहा पावडर विकण्याचा व्यवसाय आहे. त्याचा भाऊ राहुल याचा 15 जुन रोजी तारदाळ माळावरील आयकॉनीक कंपनीच्या मागे रेल्वे रुळाजवळ मृतदेह मिळून आला होता. राहुल याच्या मृतदेहापासून काही अंतरावर पडलेल्या रक्तामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिसांनी नातेवाईकांकडं कसून चौकशी केली असता वडील दिलीप कोळी यांनी विकास पोवार आणि सतीश कांबळे यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. अधिक तपासात राहुल कोळी हा 10-12 वर्षांपासून मद्यपान करून घरी त्रास द्यायचा, वडीलांना घरातून निघून जा म्हणत धमकीही देत होता. तसंच लोकांकडून पैसे घेऊन कर्जाचा डोंगर केल्यानं या त्रासाला कंटाळून वडील दिलीप कोळी यांनी विकास पोवार आणि सतीश कांबळे यांच्याशी संगनमत करून राहुलच्या खूनाचा कट रचला. त्यासाठी विकास आणि सतीश यांना 50 हजार रुपयेही दिले होते. त्याप्रमाणे बुधवारी रात्री दिलीप यांनी मुलगा राहुल याला दुचाकीवरून आयकॉनीक कंपनीच्या मागे रेल्वे रुळाजवळ सोडून दिले. त्यानंतर विकास आणि सतीश या दोघांनी यंत्रमागाच्या मार्‍याने राहुलच्या डोक्यात वर्मी घाव घालून खून केल्याची कबुली दिली आहे. आज पोलिसांनी संशयीत तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांनी 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा