*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ. आदिती मसुरकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*तोच चंद्रमा नभात⭐*
*(ललित लेख )*
🌛🌝🌟🌝🌝🌝🌟🌝🌜
*पौर्णिमेचा चंद्रमा*
*नभी आज पाहिला*
*राजबिंडा मुखडा*
*मनमंदीरात राहिला*
आनंदाने फुललेला तेजाने झळकणारा तुझा मुखडा पाहून मी वेडावून गेले… भान हरपून एकटक नजरेने मी तुझ्याकडे पाहतच राहिले….. तुझ्याभोवती रिंगण घालणाऱ्या तारकांचा पुंज मला चिडवत होता. वेडावून दाखवत होता. आपल्याच नादात या तारका तुझ्याभोवती चमचमत नाचत होत्या. मुरडत होत्या. त्यांचा तो नाच खूपच विलोभनीय भासत होता. चमचमणाऱ्या तारांगणात तू नभीचा राजपुत्र ऐटीत रुबाबात विहार करत होतास…. चित्त हरपून टाकणारे ते सारे दृश्य मी नयनांत साठवून ठेवत होते..….
पण हळूहळू कलेकलेने कमी होणारा तुझा आकार पाहून मी अचंबीत झाले. पण बदलणाऱ्या त्या चंद्रकोरीच्या रुपात सुद्धा तू खूपच मोहक दिसत होतास……
अमावस्येच्या काळोख्या रात्री मात्र मी फार घाबरून गेले. दचकून मी इकडे तिकडे पाहत होते. किर्रर रातकिड्यांच्या कर्णकर्कश आवाजाने माझ्या कानठिळ्या बसल्या . ही भयाण शांतता मला नकोशी वाटत होती. सगळीकडे भेदरलेल्या नजरेने मी तुला शोधत होते . पण तू कुठेच दिसत नव्हतास.
*चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास ?*
*ढगांच्या आड कुठे गायब झालास ?*
*माझ्यावर आज रुसलास का ?*
*डोंगराच्या आड लपलास का?*
अरे, असा रुसू नको. मी तर तुझी गंमत करत होते. तुझ्याशी लपंडाव खेळताना , त्या उंच पर्वतरांगांच्या मागे मी लपून बसले होते. दुरुनच तुला लपून छपून पाहत होते. दररोज बदलणारे तुझे आगळेवेगळे रूप डोळ्यांत साठवत होते. तू मात्र खूप चिडलास. अचानक गायब झालास ?
तुझ्या एका कटाक्षासाठी मी रात्रभर एकटीच या पर्वतरांगांच्या कुशीत बसून व्याकूळ नजरेने तुझी वाट पाहत होते. तुझ्या शीतल प्रकाशाने माझे जीवन उजळून गेले होते. तुझ्या अस्तित्त्वाची चाहुल माझ्या मनाला उल्हासित करते. रवी अस्ताला गेला की माझे डोळे नकळतपणे तुझ्या वाटेकडे धाव घेतात. हृदयाची स्पंदने वाढू लागतात. रातराणीचा मंदधुंद सुगंध मनमंदीरात दरवळतो. तू येणार म्हटल्यावर नकळतपणे ओठ गुणगुणायला लागतात. गालावर लाली झळकते. पापण्यांच्या पाकळ्या उघडझाप करत तुला शोधू लागतात..….
आज इतक्या वर्षांनंतर अचानक तुझ्या सोबत या नभांगणाच्या उद्यानात फिरण्याची संधी चालून आली आहे. दैवयोगच म्हणावा लागेल हा !
*शुक्र चांदणी मी*
*आज अंबरी प्रकटले*
*तुझ्या पाऊल खुणांनी*
*जीवन तेज झळकले*
हे नभीच्या चंद्रमा तुझे हे रूप मला डोळे भरून पहायचे आहे …. तुझ्या सहवासात मला प्रीतीच्या सरींनी आज चिंब भिजायचं आहे… काही क्षण का असेना पण तुझ्या संगतीने या नभांगणात मला मिरवायचं आहे … तुझ्या सहवासातील हा आठवणींचा अमूल्य ठेवा मला हृदयाच्या सुवर्ण पेटीत जपून ठेवायचा आहे. हा आठवणींचा ठेवा हसत खेळत जीवन प्रवास करण्यासाठी मला अखंड साथ देणार आहे ….
*🖋️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-