सावंतवाडी :
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची जिल्हा सायबर शाखेत बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी दोडामार्गचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले.
फुलचंद मेंगडे यांनी सावंतवाडी तालुक्यात गेले दहा महिने चांगल्या पद्धतीने काम केले होते. त्यांची प्रशासकीय पकड चांगली होती. शहरात चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न होते. मात्र, अचानक त्यांची बदली का झाली, हे कळू शकले नाही. यापूर्वी या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा या ठिकाणी कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी मेंगडे यांना नियुक्ती देण्यात आली होती.