You are currently viewing वारीत रंगले कविसंमेलन

वारीत रंगले कविसंमेलन

वारीत रंगले कविसंमेलन

साहित्य सम्राट संस्थेने सालाबादप्रमाणे वारीमध्ये १६८ वे कविसंमेलन एस.आर.पी.ग्रुप नं. २ हडपसर मध्ये आयोजित केले होते. शिवमंदिरात ह.भ.प.बदधे महाराज यांच्या दिंडीमध्ये डॉ.जयवंत अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.अवघाची संसार सुखाचा करीन .. या संत वचनाला आत्मसाथ करीत जीवनाचा आंनद घेऊन आपण सगळे पांडुरंगाच्या भेटीसाठी माहेरच्या ओढीने भक्तिरसात चिंब झालो आहोत असे अवघडे यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या मंचावर ३५ क्र.दिंडीचे प्रमुख बदधे महाराज, ज्ञानाई फाउंडेशनचे सिताराम नरके, जेष्ठ नागरिक संघाचे ठाकूर, दिंडी स्थळ व्यवस्थापक सूर्यकांत लबडे, ह.भ.प.पुरुषोत्तम गायके महाराज, प्रसिद्ध निवेदक जगदीप वनाशिव आणि साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ उपस्थित होते.
संत, वारकरी आणि कवी यांचे विचार एकच असतात. ते साहित्यातून समाजास नित्य प्रबोधन करीत असतात.म्हणूनच हा वारीतील उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. असे प्रास्ताविक करताना अष्टुळ बोलत होते. महाराष्ट्रातुन आलेले वारकरी, गावकरी, जेष्ठ नागरिक संघ आणि भाविक. भक्तीरसातील कविता, अभंग, ओव्या, भारुड, गीते आणि अखंड या काव्य प्रकारामध्ये अक्षरशः भक्तिमय होऊन गेले. कविसंमेलनात नानाभाऊ माळी, शरयू गायके, संजय भोरे, गौरव नेवसे, आदित्य राठोड, सौ इनामदार, सौ.अर्चना अष्टुळ, बबन धुमाळ, बाळासाहेब गिरी आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर यांनी आपल्या सादरीकरनाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे स्वागत पुरुषोत्तम गायके, सूत्रसंचालन जगदीप वनशिव आणि आभार नानाभाऊ माळी यांनी व्यक्त केले.

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा