You are currently viewing मालमत्ता कर सॉफ्टवेअरमध्ये त्वरीत बदल करण्याची इनाम संघटनेची महापालिकेकडे मागणी

मालमत्ता कर सॉफ्टवेअरमध्ये त्वरीत बदल करण्याची इनाम संघटनेची महापालिकेकडे मागणी

मालमत्ता कर सॉफ्टवेअरमध्ये त्वरीत बदल करण्याची इनाम संघटनेची महापालिकेकडे मागणी

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील विविध प्रकारात वाढलेला मालमत्ता कर नुकताच महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कमी करण्यात आला आहे.परंतू ,मालमत्ता कर भरण्यासाठी असलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये अजूनही जुनाच कर दाखवत असून त्याबाबत सुधारणा करून कमी झालेला घरफाळा दिसावा ,जेणेकरून मालमत्ताधारकाना ऑनलाईन घरफाळा भरणे सोयीस्कर होईल , अशा मागणीचे निवेदन इनाम संघटनेच्या वतीने प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांना देण्यात आले.
यावेळी त्यांनी याबाबत आदेश दिलेले असून लवकरच सदर काम पूर्ण होईल. त्यानंतर ऑनलाईन घरफाळा भरण्याचे काम सुलभ होईल असे सांगितले.तसेच वाढीव रक्कम प्रिंट झालेल्या घरफाळा पावत्यावर शिक्का मारला असून त्यामध्ये वाढलेले कर वगळून भरण्याचे आवाहन केले आहे.ज्या मिळकतधारकांनी वाढीव दराने घरफाळा भरला आहे , त्यांची रक्कम पुढील घरफाळ्यातून वजा करण्यात येणार असल्याचे सांगितले.घरफाळा भरताना संयुक्त करात दिलेला रिबेट कायम असून त्यामध्ये कसलाही बदल करण्यात आला नसल्याचे करअधीक्षक अरिफा नुलकर यांनी सांगितले.
यावेळी इनाम संघटनेचे राजू कोन्नूर,राम आडकी,उदयसिंह निंबाळकर,संजय डाके,महेंद्र जाधव,लक्ष्मण पाटील,दीपक अग्रवाल,डॉ सुप्रिया माने,कल्पना माळी, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा