You are currently viewing करूळ गावठण प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

करूळ गावठण प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

वैभववाडी :

 

उमेद फौंडेशन च्या वतीने वि. मं. करूळ गावठण ब प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रशालेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा सौ. कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गुरव, सुभाष वळंजु, मुख्याध्यापिका ऋचा पवार, शिक्षक सागर पेंडुरकर पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

उमेद फौंडेशन चे कार्य खूप महान आहे. संपूर्ण राज्यात यांचे कार्य सुरू आहे. समाजातील गरीब, गरजूंच्या पाठीशी ही संस्था कायमच राहिली आहे. या फौंडेशनचे प्रतिनिधी सागर पेंडुरकर यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळवून दिले आहे. त्याबद्दल पालकांनी पेंडुरकर यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा पवार यांनी तर आभार पेंडुरकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा