शुन्य शिक्षकी शाळांबद्दल शासनाच्या विरोधात छेडले आंदोलन
शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा
शून्य शिक्षकी शाळांमुळे विद्यार्थ्यांचे होणाऱ्या नुकसाना बद्दल शासनाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली पंचायत समिती समोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. “या शिक्षण मंत्र्यांचे करायचं काय” “खाली डोकं वर पाय” अशा घोषणा देत शासनाचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध केला. तर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरच शिवसेना गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. गेल्या अनेक वर्षानंतर कणकवली पंचायत समिती समोर अशा प्रकारे मोठे आंदोलन झाले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले सचिन सावंत माजी नगरसेवक कन्हया पारकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना तालुका प्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, प्रसाद अंधारी, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री, तात्या निकम, वैभव मालनडकर, सिद्धेश राणे, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, निसार शेख, माजि जि प सदस्य स्वरूपा विखाळे, प्रदीप सावंत, जयेश धुमाळे, तेजस राणे, ललित घाडीगावकर, रुपेश नार्वेकर, रुपेश आंबडोसकर, सिकंदर मेस्त्री, सोहम वाळके, विलास गुडेकर आधी उपस्थित होते. या वेळी जोरदार घोषणा देत शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. तसेच गटविकास अधिकारी येईपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका देखील ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आली. अखेर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण हे आंदोलन कर्त्याना सामोरे गेल्यानंतर एकही शाळा विना शिक्षकी राहता नये, शिक्षण स्वयंसेवक यांची नियुक्ती करा. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला. यावेळी पालकांनी देखील आम्हाला महागड्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करता येणार नाही. आम्ही मोल मजुरी करतो अशा भावना व्यक्त केल्या.