You are currently viewing वारी पंढरीची

वारी पंढरीची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वारी पंढरीची*🚩🚩

दिंडया पताका झळके
पंढरीच्या वाटेवरी
तहान भुक विसरले
पंढरीचे वारकरी

उंच घेऊनी पताका
डोईवरी तुळस माता
हाती घेऊनिया टाळ
गाती तुकोबाची गाथा

गळ्यामध्ये तुळशीमाळ
भाळावरी अभीर बुक्का
वारकऱ्यांमध्ये भासे
माझा विठ्ठल नेटका

मुखी घेती हरिनाम
गोलाकार करुनिया
ओवी, अभंग गायन
टाळ चिपळी धरूनिया

संत तुकोबाची वारी
चाले नाचण खेळणं
सोहळा तो मनोहर
फिटे डोळ्यांचे पारणं

पंढरीच्या वाटेवर
विठु नामाचा गजर
आषाढी नि कार्तिकीला
सजे पंढरी नगर

राम प्रहरीच्या वेळा
जमे वैष्णवांचा मेळा
काकडआरती करती
पंढरीच्या विठोबाला

आले दारीं देवा तुझ्या
शिणले संसारात बाई
वारी कधी न चुकली
आता चरणाशी घेई

*शीला पाटील. चांदवड.*

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा