दोडामार्ग
पावसाळ्यात वीजेची खरी गरज असताना दोडामार्ग तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्रासोबत असलेल्या कराराची पुर्तता महावितरण अधिकाऱ्यांनी पूर्ण न केल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे लोकांना अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या दोडामार्ग येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी दोडामार्ग महावितरण कार्यालयावर धडक देवून बंद केलेला वीज पुरवठा तातडीने सुरू करावा नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी,युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, युवा सेना तालुका संघटक संदेश राणे,विभागप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस,युवा सेना उपतालुका प्रमुख संदेश गवस, कोनाळ विभागाप्रमुख संतोष मोर्ये,महिला शहर प्रमुख लीना कुबल आदी उपस्थित होते.