You are currently viewing ब्रह्मरूप सावळे कृपाळु

ब्रह्मरूप सावळे कृपाळु

*महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे सदस्य लेखक कवी सूर्यकांत चव्हाण लिखित अप्रतिम लेख*

*ब्रह्मरूप सावळे कृपाळु*
*अवतरला स्वर्ग वाळवंटी*
*भक्तीरंग विठ्ठलु ,विठ्ठलु !*

✍🏻धर्मशास्त्रातील व अध्यात्मिक सूत्रांच्या विस्तृत विवेचनावरून ब्रह्म हे एक अविनाशी असे तत्व असून ते या पृथ्वीतलावरील सर्व चर व अचर अशा अस्तित्वामध्ये स्थीत आहे. हे तत्वच निराकार, निर्गुण, विविध सुगंधाने युक्त आणि प्रकाशमय आहे. हे तत्त्व हेच ईश्वरीय तत्व असून हे सर्वव्यापी आहे. या तत्वाची अनुभूती आनंद आणि शांती देते.हे तत्त्व अ-बाधित असून ते जाणल्यानं सर्वात प्रथम मृत्युचे भय नष्ट होते कारण अनंत अनंत गतकालामध्ये सुध्दा हे जाणणारा अनेक जन्म या पूर्वीही जगत होता याची तात्काळ प्रचिती त्यास येते. या विश्वामध्ये प्रत्येक जण हा मृत्युच्या भयाने ग्रासलेला आहे. जीवन जगत असताना सर्वात मोठे दुःख मृत्युचे असते कारण आप्तगोप्तांच्या विरहा बरोबर आपण स्वतःसुध्दा कधीना कधी या मृत्युच्या अधिन होणारच आहोत हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही!
🌷ईश्वरी साक्षात्काराने जीव मृत्युभयापासून कायमचा मुक्त होतो आणि ही मुक्ती त्याला *आनंद* देते. या दर्शन लाभाने पारलौकिक विश्वाचे अनाकलनीय असे अनुभव त्याला येत राहतात, कित्येक जन्म अगदी सहज आठवतात, मन, मनाचे विकार व मोनोव्यापार यांचा लय होतो आणि या मुक्त, मोकळ्या आकाशात विहाराच्या विहंगम आनंदाच्या लहरीमध्ये तो सम-रस होतो…. आणि या आनंदाच्या लहरी आणि उर्मी येतच राहतात या अनुभवामध्ये सर्व दुःखांचा विलय होतो आणि फक्त आनंद आणि आनंदच उरतो ! अशी व्यक्ती आधी सर्व आस्तित्वा बाबत सम होते आणि नंतर समाधीच्या सुखामध्ये निरंतर राहते! हा समाधीतील आनंद, या आनंदाच्या लहरी एक नवी दृष्टी देतात…. जे तत्व स्वतःमध्ये पाहिले, अनुभवले तेच सर्वत्र आहे, सर्व आकाश,प्रकाश पृथ्वी ,जल, वायु यात आणि या आस्तित्वात भरुन राहिले आहे आणि हे कधीच संपत नाही, नष्ट होत नाही याची अनुभूती हीच अ-मृताची अनुभूती असल्याने यास ब्रह्म जाणले आहे असे म्हणतात आणि या ब्रह्म अनुभूती बरोबर ज्या आनंद लहरीबरोबर जगत असणारा योगी हा सतत ब्रह्मानंद उपभोगत असतो.

🌷अध्यात्मामध्ये जो साधक निरंतर साधनेने अतिउच्च स्थानावर पोहलेला आहे, ज्याने स्वतःला जाणले आहे,ज्याने ईश्वराला जाणले आहे आणि जो ब्रह्मस्वरूपच झाला आहे तोच मुक्त आहे !ही पात्रता भगवंताची, सद्गुरूची कृपा,साधकाची अथक साधना आणि अहंकाराच्या पूर्ण निवृत्तीनेच येते! असो….
*।।रामकृष्ण हरी।।*
*🔯शुभं भवतु!🔯*
*सूर्यकांत चव्हाण ,अमित विहार, पुणे.*
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा