14 जून 2023 पासून ओसरगाव टोल नाका सूरू करण्याच्या हालचाली सूरू आहेत परंतू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनाना जो पर्यंत ओसरगाव टोल नाक्यावर टोलमधून मुक्ती मिळत नाही तो पर्यंत ओसरगाव टोल नाका सूरू होऊ देणार नाही असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे.
जिल्ह्याच्या मध्यभागात ओसरगाव या ठिकाणी हा टोल नाका असल्यामुळे जिल्ह्याअंतर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनाना राष्ट्रीय महामार्गाच्या टोलाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एकतर हा टोल नाका जिल्ह्याच्या हद्दीवर न्या अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनाना टोल मुक्ती द्या. 14 जून 2023 पासून टोल वसूलीचा हा प्रशासनाने घातलेला घाट कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.