You are currently viewing मनसेच्या ‘राजगड’ या मालवण तालुका कार्यालयाचे उद्या उदघाटन

मनसेच्या ‘राजगड’ या मालवण तालुका कार्यालयाचे उद्या उदघाटन

मालवण

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘राजगड ‘ या मालवण तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन दि. १४ एप्रिल रोजी मालवण एसटी स्टॅन्ड समोरील प्राईड लँड इमारती मधील गाळा नं.१४ येथे होणार आहे. या उदघाटन सोहळ्यास मनसेचे राज्य चिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर उपस्थित राहणार आहेत.

मालवण मधील मनसे कार्यकर्ते तसेच जनतेला आपल्या हक्काचे कार्यालय मिळावे या हेतूने राजगड या मालवणातील कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न कमी कालावधीत सोडविण्याचे व त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सर्व महाराष्ट्र सैनिक करू असे मालवण तालुका मनसेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

मालवण तालुक्यात किंबहुना जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मजबूत करण्याच्यादृष्टीने सध्या प्रयत्न सुरू असून मनसे पक्षात अनेक युवा व तरुण कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. अलीकडेच मालवण चौके येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक प्रीतम गावडे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता . यावेळी श्री गावडे यांनी कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा करतानाच युवा मंडळींना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढ व मजबुतीकरणासाठी आपण प्रयत्न करू असे म्हटले होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 12 =