रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व असलदे ग्रामपंचायत च्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन ; शेतक-यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन
कणकवली
आंबा व काजु बागायतदारांनी किफायतशीर असलेली सेंद्रीय शेती करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रीय शेतीमुळे होणारा खर्च मर्यादित होवून शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होते , त्यासाठी आवश्यक ते तंत्र आत्मसात केले पाहिजे. भात शेती मध्ये उत्पादित झालेला तांदुळ बाजारात उकडा तांदूळ करुन विकल्यास शेतक-यांनी चांगला नफा होईल . रासायनिक खतांचा मर्यादित वापर करुन पारंपारिक सेंद्रीय खतांचा वापर शेतक-यांनी करावा. विषमुक्त शेती करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घेतल्यास आम्ही मार्गदर्शन करु शेतक-यांनी पारंपारिक बी –बियाण्यांची जोपासना केली पाहिजे. शेतक-यांनी नफ्यात वाढ होण्यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी असे , आवाहन छ. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद ओगले यांनी केले.