विद्यार्थ्यांसाठी इंटरशीप प्रोग्रामचे आयोजन.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे प्रथम वर्ष संगणक शास्त्र व माहितीतंत्रज्ञान यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.हे दोन्ही अभ्यासक्रम तीन वर्षाचे असून यासाठी नवीन संगणक लॅब तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.ज्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र या विषयांमध्ये पदवी प्राप्त करायची असेल त्यांनी त्वरित महाविद्यालयाला संपर्क साधावा व प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल यांनी केले आहे.
संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दिनांक 10 जून ते 24 जून 2023 पर्यंत 15 दिवसाच्या इंटरशीप प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सॉफ्टमस्क प्रायव्हेट लिमिटेड बेळगाव या कंपनीच्या वतीने याचे आयोजन महाविद्यालयामध्ये केले आहे.इंटरशिप प्रोग्रॅमची वेळ दुपारी 1.30 ते 5 असणार आहे. तरी महाविद्यालयातील IT , CS व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. डी.एल भारमल यांनी केले आहे.