*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सदस्य कवी सोमा चंद्रकांत गावडे लिखित समाज प्रबोधनपर कविता*
*प्रवासी जना वारी सुखकारी*
प्रवासी जना पळभर वारी
जीवेश्वर सुखविण्यास वारी |
रस्त्यावरती हो वाहनधारी
ही नित्य होय पंढरीची वारी ||१||
जवळी असे काया ही पंढरी
जीव विठ्ठल हृदय मंदिरी |
अस्तित्व कार्या कारणे विहारी
ही नित्य होय पंढरीची वारी ||२||
मार्गे शास्त्र पाळावे सुखकारी
रस्ता गर्दीचा गतिरोधकारी |
वाहना न बांध हो धक्काकारी
ही नित्य होय पंढरीची वारी ||३||
मार्ग निर्माते हो अभ्यासू भारी
गतिरोध सुचक रंग तारी |
आरोग्या होवो भावगंध वारी
ही नित्य होय पंढरीची वारी ||४||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला,
जि.:- सिंधुदुर्ग.
गतिरोधकाचे शास्त्र अभ्यासून अत्यावश्यक तेथे निमुळते योग्य उंचीचे गतिरोधक असावेत तीन – तीन ,चार – चार एकत्र गतिरोधक हे गतिरोधक नसून संकटदायक असून जीवनरोधक आहेत. सर्व रस्त्यांवरील गतिरोधकावर पांढरे रेडियमयुक्त रंगपट्टे असावे जेणेकरून प्रवाशांना पूर्व सुचना दुरुनच मिळून सावध होता येईल. कशाला अडाणीपणाने कायारुपी पंढरीला अवकळा आणून दोष माथी घेता.
सुविचारार्थ.
धन्यवाद!
शुभम् भवतु !
🙏🙏🙏