सावंतवाडी:
सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील वसोली येथील एकाला ताब्यात घेतले. कृष्णा उर्फ राजन गुरव (वय 37, रा. वसोली कुडाळ सध्या रा. माजगाव खालची आळी) असे त्याचे नाव आहे. काल याच गावातील आणखी एकावर कारवाई करण्यात आली होती.
त्याच्याकडून ३ लाख ६२ हजार २०० रुपयाच्या दारूसह ७ लाखाची गाडी असा १० लाख ६२ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दाणोली येथील विश्रामगृहाच्या समोरील मार्गावर करण्यात आली. संबंधित संशयित हा स्काॅर्पिओ MH 07 Q 4372 या गाडीत दारू भरून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. याबाबतची माहिती अज्ञाताकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई अनुपकुमार खंडे, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, यश आरमारकर आदीच्या पथकाने कारवाई केली.