You are currently viewing साने गुरुजी

साने गुरुजी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजेच सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त काव्यरचना*

*साने गुरुजी*
————————–

शंभर वर्षानंतरही
कीर्ती पसरत जाई
अजूनही विचारतात
कोण मुलांची आई

नाजूक,कोमल मन
तरी आतून कणखर
जगाला प्रेम अर्पावे
धर्म संगती जीवनभर

आईचे प्रेम सांगताना
सुटून जाई सारे भान
आयुष्यभर मग गायले
मातृप्रेमाचे मंगल गान

दुःखी,दीनांचा कळवळा
अंगावर साधा वेश
एकविस दिवसांचे उपोषण
घडला मंदिर प्रवेश

मुलात मूल झालात
कधी मुलांची आई
संस्कारक्षम गोष्टीतून
प्रभूशी नाते जोडत जाई

आंतरभारतीचे स्वप्न
शिष्यांनी केले साकार
साऱ्याच भाषा भगिनीं
देतात सुंदर आकार

मुलात मूल होऊन तुम्ही
राखली साऱ्यांची मर्जी
आदरभावे वंदन करतो
तुम्हास साने गुरुजी

श्रीनिवास गडकरी
रोहा पुणे
9130861304
@ सर्व हक्क सुरक्षित
11.06.2023

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा