You are currently viewing वसुधा नाईक यांच्या कथेला पुरस्कार

वसुधा नाईक यांच्या कथेला पुरस्कार

पुणे :

 

मधुरंग इंटरनॅशनल या संस्थेतर्फे ज्येष्ठ लेखिका सौ.वसुधा नाईक यांच्या ‘रमाची पाटी’ या कथेला नुकताच ‘मधुरंग इंटरनॅशनल लिटरेचर अवॉर्ड 2023’ पुरस्कार प्राप्त झाला.

सदर पुरस्कार पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. गरिबीतून वर आलेल्या, कचरा वेचणाऱ्या, बालिकेच्या शैक्षणिक यशावर ही कथा आधारित आहे.

यापूर्वी वसुधा यांना काव्य लेखन, शैक्षणिक क्षेत्र,पर्यावरण व सामाजिक क्षेत्र या संदर्भात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच बरोबर ‘रमाची पाटी’ या कथेवर आधारित लघुपटास देखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

तळागाळातील लोकांवर आधारित असणारे वास्तववादी लेखन निश्चितच समाजाला प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन प्रकाश नाईक यांनी केले तर सीमा नाईक यांनी मान्यवरांचे आभार मानले.

या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणारे म्हणजे वसुधा नाईक यांची आई विद्या नाईक, त्यांचे पर्यावरण प्रेमी साथीदार शशिकांत सुतार यांनी त्यांचे खूप खूप कौतुक केले.

“शिक्षिका असल्याने विद्यार्थ्यांप्रती एक शिक्षणाची, प्रेमाची गाठ बांधली गेली आहे. मुलांना शिकवणे ही एक कला आहे, आणि या कलेचे सोने करणे हे नेहमीच मला आवडते त्यांचे सुखदुःख समजावून घेणे आणि त्यांच्यावर त्या प्रमाणात उपचार करणे, संस्कार लावणे हे नेहमीच मला आवडते” या प्रकारे वसुधा नाईक आपल्या बोलण्यातून व्यक्त झाल्या.

या सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टर घाणेकर यांनी ‘डहाळी’ विशेष अंकाचे प्रकाशन सामाजिक, कार्यकर्त्या कोमल नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी गुणी बालकांना ‘मिठू मिठू पोपट’ या पुरस्काराने तर काही पालकांना ‘लाफ इंटरनॅशनल’ पुरस्काराने डॉक्टर घाणेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. छोटासा सोहळा खूप छान रंगला.

 

वसुधा नाईक, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा