कार्यालये पुन्हा तिलारीत आणा – पंकज गाड
दोडामार्ग
तिलारी मुख्य धरण क्षेत्रात मेन कॉलनी येथील प्रशासकीय कामकाज चालवत असलेली तिलारी शीर्षकामाची कार्यालय आज मितीस या ठिकाणापासून ६० किलोमीटर लांब चराठे सावंतवाडी या ठिकाणी हलविण्यात आलेली आहेत. त्यामुळे तिलाही धरणावर कोणताही जोखमीचा प्रसंग आल्यास या ठिकाण कोणताही अधिकारी योग्य निर्णय घेण्यास पात्र असतो त्यामुळे हे कार्यालय तिलारी येथे पुन्हा आणावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दोडामार्ग तालुका पंकज गाड यांनी जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणी केलेली आहे.
तिलारी धरण क्षेत्रात सतत कोसळत असलेला मातीचा भराव तसेच पर्यटनाच्या दृष्टीने कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेले तिलारी गार्डन क्षेत्र, कालव्यांची झालेली दुरावस्था या बाबी लक्षात घेता या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी ही कार्यालय प्रत्यक्ष तिलारी धरण क्षेत्रात असणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे यावेळी यावेळी पंकज गाड यांनी म्हटले आहे.