You are currently viewing जानवली रतांबी व्हाळ येथे अपघातात तरुण गंभीर जखमी

जानवली रतांबी व्हाळ येथे अपघातात तरुण गंभीर जखमी

कणकवली

कणकवलीहून फोंड्याच्या दिशेने दुचाकीने जात असताना झालेल्या अपघातात सचिन नाकाडी (वय 36, फोंडाघाट झार्येवाडी) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात महामार्गावर जानवली रतांबी व्हाळ या दरम्यान आज शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर स्थानिकानीं घटनास्थळी धाव घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न देसाई यांनी देखील जखमीला उपचाराकरता दाखल करण्यासाठी मदत कार्य केले. रुग्णवाहिकेद्वारे जखमी ला उपचाराकरता कणकवली रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा