You are currently viewing हरावलेलो पावस

हरावलेलो पावस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम मालवणी कविता*

*हरावलेलो पावस*

पावसाचा नाय पडला शिवार
नाय लागली पावळेक धार
आंगातसून ओतता घाम
सांगा कोणार फोडू खापार..?

मिरग गेलो सुको सुको
ह्या पावसार पडलो वाको
मळभाकडे बघून म्हणता राजा
“देवा, इतको पण कोपा नोको”

आंबे काजी उलागले आणि
गेली खळ्यार सोला सुकान
रात दिस बघतत आशेन लोक
मळाभ भरता काय वाकान

न्हय व्हाळ सुकान गेले
माशे कोंडीतच तडफाडले
पाणी नाय रीगला बिळात
नि कुर्ले भितुतच अडाकले

आज येयत उद्या येयत असो
अंदाज रोज वेधशाळा बांधता
मायेराक गेल्ल्या बायलेसारखो
पावस आजुन केरळात नांदता

वसरेतल्या खुटयेर नांगर
वगी धार लावन तयार बसले
नांगराकडे बगून मांगरात
बैल मात्र दात काढून हसले

© दीपक पटेकर {दीपी}
८४४६७४३१९६

 

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा