You are currently viewing मळेवाडला सापडलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप नाही

मळेवाडला सापडलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप नाही

सावंतवाडी

मळेवाड-भटवाडी येथे चार दिवसांपूर्वी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेल्या पुरुषाची अद्याप ओळख पटलेली नाही. सदरची व्यक्ती मळेवाड-भटवाडी येथे रस्त्यालगतच्या काजू बागेत मृतावस्थेत आढळली होती. पोलिसांनी स्थानिक परिसरात माहिती घेतली. मात्र, दोन दिवस उलटून गेले तरी ओळख पटलेली नाही. सदर मृत व्यक्ती ५५ ते ६० वयोगटातील आहे. सदर मृत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सावंतवाडी पोलीस ठाणे ०२३६३-२७२०६६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा