You are currently viewing सोशल मिडीयाच्या माध्यमातून भाजपा घरा घरात – मना मनात पोहचला पाहिजे….

सोशल मिडीयाच्या माध्यमातून भाजपा घरा घरात – मना मनात पोहचला पाहिजे….

— सोशल मिडीया जिल्हा संयोजक अविनाश पराडकर 

ठाकरे सरकारकडून मिडीयाची मुस्कटदाबी – अविनाश पराडकर 

महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारच्या आश्रयाने सोशल मिडीयामध्ये जो उच्छाद मांडला जात आहे व ज्या पद्धतीने मिडीयाची मुस्कटदाबी केली जात आहे, ती रोखण्यात यावी व सोशल मिडीयाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे अशी भुमिका भाजपाची आहे असे प्रतिपादन सोशल मिडीया सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अविनाश पराडकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, वेंगुर्लेची मासिक बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपमध्ये सोशल मिडीयाला कीती अनन्यसाधारण महत्त्व आहे, याबाबत पराडकर यांनी मार्गदर्शन केले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंत्योदयाच्या योजना सोशल मिडीयाच्या माध्यमातून घरा – घरात पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले .यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटनीस निलेश सामंत व ॲड. सुषमा खानोलकर, जेष्ठ नेते बाळा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर , सोशल मिडीया प्रमुख व परबवाडा सरपंच पपु परब, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी ॲड. सुषमा खानोलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष मान. जगतप्रकाश नड्डाजी यांच्या नेतृत्वाखाली बिहार राज्यासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजराथ, कर्नाटक व हरियाणा राज्यात पक्षाने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला . तसेच संपूर्ण देशात भाजपाने जो विजय संपादन केला तो पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या विजय असल्याचे सांगितले. त्यामुळेच बुथरचनेला भाजपा मध्ये सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे *जिकडे बुथ सक्षम तीकडे भाजपा भक्कम अशी परिस्थिती आहे .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी तालुक्यातील बुथरचनेचा आढावा घेतला . त्याचप्रमाणे युवा मोर्चाच्या वन बुथ – टेन युथ ह्या रचनेचा आढावा घेतला .तसेच बुथरचना करताना सर्वांना सामावून घेऊन सर्व सामावेशक बुथकमीटी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले .तसेच दिनांक २० व २१ नोव्हेंबर रोजी होणारया कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची माहिती देण्यात आली.
यावेळी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पदी केशव प्रकाश नवाथे यांची निवड करण्यात आली. तसेच युवा मोर्चा ता.चिटनीस पदी समीर नाईक ( मठ) यांची निवड करण्यात आली .
या बैठकीस शक्ती केंद्र प्रमुख – नाथा मडवळ ( म्हापण ) , संतोष शेटकर ( तुळस ), विजय बागकर ( आसोली ), निलेश मांजरेकर ( उभादांडा ), विद्याधर धानजी ( आरवली ). ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, तुळस सरपंच शंकर घारे, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर, युवा मोर्चा चे हेमंत गावडे – तुषार साळगांवकर – संकेत धुरी – संदीप पाटील – सुश्मित बांबुळकर – सौरभ नागोळकर – सोमकांत सावंत – केशव नवाथे . बुथप्रमुख – विनय गोरे – भगवान कुबल – शेखर काणेकर – शामसुंदर मुननकर – गुरुनाथ घाडी – सचिन गावडे – विलास कुबल – संदीपकुमार बेहेरे . महीला मोर्चाच्या व्रुंदा गवंडळकर , राजन रेडकर, रविंद्र राणे, शरद मेस्त्री इत्यादी उपस्थित होते. बैठकीचे आभार प्रदर्शन ता सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा