You are currently viewing वीज समस्यांबाबत हळवल ग्रामस्थांची महावितरण अभियंतासोबत चर्चा

वीज समस्यांबाबत हळवल ग्रामस्थांची महावितरण अभियंतासोबत चर्चा

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील हळवल गावात दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात लाईटची मोठी समस्या निर्माण होते. कधी विद्युत पोल पडतो तर कधी ठरलेल्या कारणांपैकी एक कारण म्हणजे मेन लाईन फॉल्ट असते. या समस्यांबाबत हळवल गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी महावितरण उपकार्यकारी अभियंता श्री. बगाडे यांची भेट घेतली. यावेळी सहाय्यक अभियंता प्रगती परसगडे उपस्थित होत्या.

यावेळी विजसमस्या आणि त्यावर उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. गावात जीर्ण झालेले विद्युत पोल बदलणे, ११ kv लाईन आणि LT लाईन वरची झाडे कटिंग करणे, हळवल भाकरवाडी, पवारवाडी, परबवाडी या तीन वाडीसाठी रिंग फिडिंग ची व्यवस्था करणे, तसेच हळवल गावासाठी नेमण्यात आले वायरमन श्री. गवस हे वेळप्रसंगी फोन उचलत नाहीत. तर सायंकाळी ७ वाजल्यानंतर फोन बंद करून ठेवतात, अशी तक्रार ग्रामस्थांनी यावेळी श्री. बगाडे यांचे जवळ केली. त्यावर श्री. बगाडे यांनी येत्या सोमवारी गावात कामगार पाठवून झाडे कटिंग करून देतो तसेच काही दिवसात जीर्ण झालेले विद्युत पोल बदलून देतो, असे आश्वासन दिले. तसेच वायरमन व शाखा अभियंता यांना सूचना सतर्कते बाबत सूचना दिल्या.

संतप्त ग्रामस्थांच्या भेटीनंतर महावितरण उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता हळवल गावात वारंवार निर्माण होणाऱ्या वीज समस्येवर तोडगा काढून पावसाळ्याच्या दिवसांत विज सुरळीत ठेवतात की पुन्हा ये रे माझ्या मागल्या करतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी हळवल गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण उर्फ प्रदिप गावडे, माजी सरपंच संतोष गुरव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पवार, मंगेश गावडे, भरत गावडे, दिपेश परब, सुदर्शन राणे, प्रशांत गावडे, शंकर परब, श्याम तांबे, आर्यन ठाकूर, संदीप गुरव, बाबू म्हाडेश्वर, उमेश परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा