अटल प्रतिष्ठान संचलित, चाईल्ड लाईन सावंतवाडीच्या वतीने बालदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
निबंध स्पर्धा :-
निबंध स्पर्धा दोन वयोगटात आयोजित करण्यात आलेली असून वयोमर्यादा वय वर्षे ६ ते १२ व १३ ते १८ असे दोन गट आहेत.
पहिल्या गटासाठी विषय आहे, “लहानपण देगा देवा” व दुसऱ्या गटासाठी विषय “मी आणि माझे आरोग्य” हा असून पहिल्या गटासाठी शब्द मर्यादा ५०० आणि दुसऱ्या गटासाठी शब्दमर्यादा ८०० आहे.
चित्रकला स्पर्धा :-
चित्रकला स्पर्धेचे तीन गटात आयोजन करण्यात आलेले असून पहिला गटाची वयोमर्यादा वय वर्षे ७ ते १० , दुसरा गटाची वयोमर्यादा वय वर्ष ८ ते १२ व तिसऱा गट वयोमर्यादा वय वर्षे १३ ते १८
पहिल्या गटातील चित्राचा विषय आहे “कोणतेही निसर्ग चित्र”, दुसऱ्या गटासाठी “प्रदुषण मुक्त दिवाळी” आणि तिसऱ्या गटासाठी “मी आणि माझे आरोग्य”
निबंध व चित्रकला स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी आपले निबंध आणि चित्र शुक्रवार दिनांक २०/११/२०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत चाईल्ड लाईन समन्वयक सौ. पूजा जगताप व्हाट्सअप नं. ९६०४९२५९४१ किंवा टीम मेंबर ॲड . चिन्मय वंजारी व्हाट्सअप नं. ७७६९८५३३८३ किंवा childlinesawantwadi@gmail.com या मेलवर पाठवावेत.
विजेत्यांना बांबूपासून बनवलेली आकर्षक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून सर्व
सहभागी स्पर्धकांना ई- सर्टीफिकेट देण्यात येणार आहे. तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन चाईल्ड लाईनचे संचालक ॲड. नकुल पार्सेकर व अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी केले आहे.