कुडाळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ व्या वर्षांत दिमाखात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० जून ला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
१० जून ला सकाळी १०.१० वाजता आठही तालुका कार्यालयात पक्षध्वजारोहण करणे, (झेंडावंदन) त्यानंतर महापुरूषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून संविधानाचे सामायिक वाचन करणे, माजीसैनिक व स्वातंत्र्यसेनानी यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. शरद पवार यांचे “लोक माझे सांगाती” या पुस्तकाचे डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस, पत्रकार, अधिकारी, प्रतिष्ठीत व्यक्ती यांना वाटप करण्यात येईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय शिबिर, रक्तदान शिबीर, आयोजित केले आहे. शेतकऱ्यांना भात बियाणे वाटप करणे, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना चादरी वाटप करणे, असे विविध उपक्रम १० जून ला सकाळी १० वाजून १० मिनिटांपासून संपूर्ण दिवस प्रत्येक तालुक्यात राबविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.